सस्नेह नमस्कार,
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशाची इकॉनॉमी ५ ट्रिलियन यू एस डॉलर्स करण्याचा निश्चय केला आहे . यात महाराष्ट्राचे काँट्रीब्युशन १ ट्रिलियन यू एस डॉलर्स करण्याचा मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी चंग बांधला आहे.
जेव्हा आपल्या राज्याची इकॉनॉमी एवढी विलक्षण वाढेल तेव्हा प्रत्येक क्षेत्र गतीने विस्तार करेल.
नवीन रोजगाराच्या, उत्पन्नाच्या अनेक संधी येतील. कोकण पदवीधर मतदार संघातील पदवीधरांचा त्यातील सहभाग कसा वाढेल , या संधी तुमच्या पर्यंत कशा पोचतील या दृष्टीने मी कसोशीने प्रयत्न करेन असा तुम्हाला विश्वास देतो.
मी गेले १२ वर्षे आमदार म्हणून 'मिशन एज्युकेशन' हा ध्यास घेऊन या ' कर्तव्यपथा' वरून वाटचाल करत आलो आहे.
विधीमंडळात आवाज उठवणे , प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनातील अडचणी दूर करणे आणि वेळ पडल्यास थेट रस्त्यावर उतरून आवाज उठवणे या तीन स्तरांवर मी काम केले आहे.
पदवीधरांसाठी स्किल डेव्हलपमेंट आणि नोकरी; शिक्षकांसाठी पगाराचे सुसूत्रीकरण, कामाचा ताण कमी करणे, शैक्षणिक सुविधा पुरवणे;
तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातील सर्वांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, विकासकामे , मदत आणि पुनर्वसन केले आहे.
शिक्षण क्षेत्रात न्यू एजुकेशन पॉलिसी येत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगले बदल होणार आहेत. त्यासाठी शिक्षकांना सुसज्य करण्यासाठी सर्वतोपरीने मी प्रयत्न करेन.
पुढील वर्षी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी तुमची मतदार म्हणून नोंदणी करा आणि तुमच्या सहभागाने आपण हे काम वेगाने पुढे नेऊयात.